रणजित चव्हाण यांच्या कार्याचा सन्मान !

स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाहीची पाळेमुळे असून नागरी प्रशासन हे कार्यक्षम आणि पारदर्शी करण्यासाठी या संस्थांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षित करण्याचे कार्य अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था गेली अनेक वर्षे करीत आहे. हे कार्य कल्पकतेने आणि निष्ठेने पुढे नेणारे संस्थेचे महासंचालक आणि बडोद्याचे माजी महापौर रणजित चव्हाण यांनाही राज्यपालांच्या हस्ते ‘नवशक्ती सन्मान ‘ देऊन सन्मानित करण्यात आले.